चिपळूण : चिपळूण शहर आणि ग्रामीण भागात अनियमित वीजपुरवठा आणि नादुरुस्त पोल,ट्रान्सफॉर्मर या तक्रारी बाबत शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शुक्रवारी सकाळी शहरातील महावितरण कंपनीच्या विरोधात धडक देण्यात आली. वीज वितरण कंपनीकडून ग्राहकांना दिल्या जात असलेल्या सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरसोयी असून या सर्व बाबी अधिकाऱ्यांच्या निदर्शनात आणून दिल्या.
शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मुराद अडरेकर, शहर अध्यक्ष रतन पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष चिपळूणचे पदाधिकारी व शिष्टमंडळाने महावितरण कंपनीमध्ये सहाय्यक कार्यकारी अभियंता राजकुमार कोंडल व नितीन कांबळी यांच्या सोबत चिपळूण शहरातील वारंवार खंडित होत असलेल्या वीज पुरवठा, तक्रार निवारण व आपत्ती व्यवस्थापन टीम बाबत, मुरादपूर सब स्टेशन, शहरांतील झाडे झुडुपे तोडणे बाकी काम, अतिरिक्त तक्रार निवारण फोन नंबर्स वाढविणे अशा नागरिकांच्या वतीने असलेल्या अनेक तक्रारीं बाबत सविस्तर चर्चा केली आणि त्वरित याबाबत उपाययोजना व्हाव्यात व शहरांतील सर्व भागांमध्ये अखंडित वीजपुरवठा करणेसाठी पाऊले उचलावीत. अन्यथा पक्षातर्फे कठोर भूमिका घेत वेळ पडल्यास कायदेशीर मार्गाने कारवाई करावी लागेल असा इशारा ही यावेळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. सर्व स्तरांवर योग्य ती उपाययोजना सुरू आहे व आवश्यक ती केली जाईल अशी ग्वाही अभियंता व अधिकारी यांनी यावेळी दिली. यावेळी पक्षाचे तालुकाध्यक्ष श्री. मुरादभाई अडरेकर, शहराध्यक्ष श्री. रतनदादा पवार, शहर उपाध्यक्ष राकेश दाते, कादीर भाई मुकादम, सेक्रेटरी मनोज दळी, युवक तालुकाध्यक्ष रोहन नलावडे, शहराध्यक्ष श्रीनाथ खेडेकर, परवेझ मेमन, सलमान मेमन, महिला पदाधिकारी सौ. रूही खेडेकर, सौ. राधिका तटकरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
चिपळुणात अनियमित वीज पुरवठा; राष्ट्रवादी काँग्रेस शिष्टमंडळाची महावितरण कार्यालयात धडक

Leave a Comment