लांजा : येथील न्यू इंग्लिश स्कूल लांजाचे क्रीडा शिक्षक रविंद्र वासुरकर यांना जयपूर (राजस्थान) येथील “वायएसएस इंडिया” या राष्ट्रीय संस्थेचा राष्ट्रीय गौरव पुरस्कार – २०२५ राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या औचित्याने जयपूर येथे झालेल्या ऑनलाईन सोहळ्यात प्रदान करण्यात आला.
क्रीडा क्षेत्रातील त्यांचे उल्लेखनीय योगदान, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले प्रयत्न, तसेच समाजात जागरूकता व नैतिक मूल्ये वृद्धिंगत करण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन हा सन्मान देण्यात आला आहे.
या डिजिटल समारंभात “वायएसएस इंडिया” तर्फे त्यांना प्रमाणपत्र, सदस्यता ओळखपत्र आणि इतर अनेक विशेष लाभ देण्यात आले. ही संस्था सैन्य दलातील निवृत्त अधिकारी यांच्या मार्फत चालविली जाते.
रविंद्र वासुरकर यांनी अनेक वर्षे शिक्षण, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षणासोबतच नैतिक मूल्यांचे संस्कार देणे, तसेच समाजात जागरूकता पसरवणे या कार्यात ते सतत अग्रेसर राहिले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक विद्यार्थ्यांना नव्या दिशा, आत्मविश्वास आणि प्रगतीची संधी मिळाली आहे. याबाबत रविंद्र वासुकर यांवू सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
क्रीडा शिक्षक रविंद्र वासुरकर ‘राष्ट्रीय गौरव पुरस्काराने’ सन्मानित
