GRAMIN SEARCH BANNER

देवरूखच्या गुंजन आशिष खवळेची दिल्लीतील राष्ट्रीय ‘वंदे मातरम्’ गायन स्पर्धेसाठी निवड

Gramin Varta
158 Views

देवरूख– संगमेश्वर तालुक्यातील देवरूखच्या गुंजन आशिष खवळे हिची देशपातळीवर भारत सरकारच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या देशव्यापी ‘वंदे मातरम्’ गायन स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

या स्पर्धेला देशभरातून स्पर्धकांच्या नोंदी प्राप्त झाल्या होत्या. या अत्यंत प्रतिष्ठित आणि स्पर्धात्मक उपक्रमातून गुंजनची देशभरातील २०० विजेत्यांमध्ये निवड झाली आहे. यासोबतच तिला कर्तव्य पथ, नवी दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय परेडसाठी उपस्थित होण्यासाठी भारत सरकारकडून अधिकृत आमंत्रण प्राप्त झाले आहे. ही परेड भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान तसेच इतर राष्ट्रीय मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. राष्ट्रभक्तीपर गीत सादर करत देशासाठी गायन करण्याची संधी मिळणे हा अत्यंत सन्मानाचा क्षण आहे. देवरूखवासियांसाठी ही अभिमानास्पद बाब ठरली आहे. गुंजनचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे. गुंजन हिने गायन, नृत्य, कॅरम, तायक्वांदो, चित्रकला तसेच विविध स्पर्धातून नेत्रदिपक कामगिरी केली आहे.

Total Visitor Counter

3366906
Share This Article