जगबुडी नदीवरील कंटेनर अपघाताप्रकरणी मृत चालकावर गुन्हा दाखल

Gramin Varta
8 Views

खेड: मुंबई-गोवा महामार्गावरील जगबुडी नदीच्या पुलावर कंटेनरचा भीषण अपघात होऊन चालकाचा मृत्यू झाल्याप्रकरणी खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अपघात २२ जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडला असून, याप्रकरणी २३ जुलै रोजी रात्री गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंटेनर (एमएच ४३ वाय ३७६१) चालक मिथिलेश कुमार सरल निषाद (वय २४, रा. गौरीशुक्ल, गौरीश्रीराम, जि. कुशीनगर, उत्तर प्रदेश) हा कंटेनर निष्काळजीपणे, हयगयीने व भरधाव वेगाने चालवत जगबुडी नदीच्या पुलावर आला. यावेळी रस्त्यावरील परिस्थितीकडे दुर्लक्ष झाल्याने कंटेनरने पुलावरील मधील डिव्हायडर तोडला आणि दोन पुलांच्या फटीतून थेट जगबुडी नदीच्या पात्रात कोसळला.

या भीषण अपघातात चालक मिथिलेश निषाद याला गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलीस पाटील संजय दिलीप शिंदे (वय ४५, रा. वेरळ नवानगरवाडी, ता. खेड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खेड पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा क्रमांक २०७/२०२६ दाखल केला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास खेड पोलीस करत आहेत.

Total Visitors :
4580980
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *