चिपळूणमधील स्प्रिंग्स क्लिनिकतर्फे ‘पेशंट असिस्टंट’ कोर्स सुरू; कोकणातील तरुणांसाठी आरोग्य क्षेत्रात करिअरची सुवर्णसंधी

Gramin Varta
95 Views

चिपळूण: आरोग्य क्षेत्रात वाढत्या प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन चिपळूण येथील स्प्रिंग्स क्लिनिक अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटतर्फे पेशंट असिस्टंट हा व्यावसायिक प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्यात आला असून, या कोर्ससाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. आरोग्य क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या कोकणातील युवक-युवतींसाठी ही एक सुवर्णसंधी मानली जात आहे. या कोर्ससाठी मर्यादित जागा उपलब्ध असल्याची माहिती इन्स्टिट्यूटतर्फे देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, प्रथम प्रवेश घेणाऱ्या दहा उमेदवारांना या कोर्ससाठी विद्यावेतन देण्याचा प्रस्ताव स्प्रिंग्स क्लिनिकतर्फे मांडण्यात आला आहे. रुग्णांची काळजी घेणे, रुग्णांना दैनंदिन सेवांमध्ये मदत करणे तसेच रुग्णालयातील विविध कामकाजात सहाय्य करणे, यासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्यावर या अभ्यासक्रमात विशेष भर देण्यात आला आहे.

या प्रशिक्षणात अनुभवी डॉक्टर व तज्ज्ञांकडून मार्गदर्शन, प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण, हॉस्पिटल इंटर्नशिपची सुविधा तसेच रुग्णालयाभिमुख अभ्यासक्रमाचा समावेश आहे. याशिवाय प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्लेसमेंट सहाय्य देण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली असून, या कोर्सनंतर हॉस्पिटल, नर्सिंग होम, क्लिनिक, डायग्नोस्टिक सेंटर, ओल्ड एज केअर सेंटर, होम केअर सेवा तसेच परदेशातही रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात, असे इन्स्टिट्यूटने स्पष्ट केले आहे. या प्रवेशाबाबत अधिक माहितीसाठी इच्छूकांनी स्प्रिंग्स क्लिनिक अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, जेड गार्डन, स्वर विहार, खेंड, चिपळूण येथे संपर्क साधावा किंवा ९७३०९०६२१६, ७९९८४९४९४९, ९६७३९५६५१४, ७५८८४७७६९० या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Total Visitors :
4580960
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *