खेड तालुका कुणबी कर्मचारी संघाचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

Gramin Varta
25 Views

खेड: खेड तालुका कुणबी कर्मचारी संघाचा विद्यार्थी गुणगौरव सोहळा नुकताच भरणे येथील जोगळे बंधू मल्टीपर्पज हॉल येथे तालुकाध्यक्ष राजेंद्र चांदिवडे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात कुणबी समाजातील सुमारे दोनशे गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच, खेड तालुक्यातील उत्कृष्ट शिष्यवृत्ती मार्गदर्शक राजेश भागणे आणि शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवलेल्या साखरोली मोरेवाडी येथील विद्यार्थ्यांचाही यावेळी गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीकृष्ण खांडेकर यांनी केले, तर सूत्रसंचालन ठोंबरे यांनी पार पाडले. या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य सचिन धाडवे आणि मानसी जगदाळे यांनी मनोगत व्यक्त करताना खेड तालुका कुणबी कर्मचारी संघ राबवत असलेल्या विविध उपक्रमांचे तोंडभरून कौतुक केले.

या सोहळ्यास सचिन धाडवे, मानसी जगदाळे, प्रशांत चव्हाण, नम्रता तांबट, शमिका म्हादे, दीप्ती शिगवण, स्वप्नाली चव्हाण, रामचंद्र आईनकर, शांताराम म्हसकर, कृष्णा आग्रे गुरुजी, अमित कदम, संतोष गोवळकर, गणेश कांदेकर, सुरज जोगळे, विलास धामणे, विजय बाईत, दीपक शिगवण, संदीप पाटील, संजना बुरटे, मच्छिन्द्रनाथ मांजरेकर, बाळू सनगरे, डॉ. श्रीकांत चांदिवडे, संतोष गोमले, मंगेश बुरटे, सुधीर वैराग आणि सचिन गोवळकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेंद्र चांदिवडे, श्रीकृष्ण खांडेकर, शैलेश पराडकर, प्रकाश कोदारे, विलास धामणे, निलेश कांदेकर, तुकाराम काताळे, शरद कदम, प्रमोद म्हादे, संदीप घाणेकर, नवनीत घडशी, संजय जाधव, राजेश भागणे, रविंद्र पाबे, भागोजी कडव, प्रशांत आंबेडे, संदीप फागे, संतोष तांबट, अंकुश भानसे, मनोहर मनवळ, रवींद्र जोगळे, सचिन जड्याळ, लक्ष्मण बाईत, चंद्रकांत रेवाळे, लक्ष्मण खाडे, महेश पवार, पूजा कोदारे, सिद्धी जाधव, रसिका रेवाळे, विद्या घडशी व ऋतुजा तांदळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Total Visitors :
4576141
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *