ईद-ए-मिलाद-उन-नबी निमित्त भाजपाच्या वतीने खेडमध्ये मुस्लिम बांधवांना पाणी बॉटल वाटप

Gramin Varta
144 Views

खेड : ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या पवित्र सणानिमित्त भारतीय जनता पार्टी खेडच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मुस्लिम बांधवांना पाणी बॉटलचे वाटप करण्यात आले. या उपक्रमातून सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि सर्वधर्मसमभावाचा संदेश देण्यात आला.

या वेळी भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर, भाजपा अल्पसंख्याक सेलचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा खेड नगर परिषदेचे नगरसेवक व गटनेते रहीम सहिबोल, भाजपा खेड शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, शहर चिटणीस अनिकेत पवार यांच्यासह आदिल सरगुरोह, साजिद रावल, सरफराज पांगारकर, हसन रिफाई सर, शमसुद्दीन खान, ओवैस चौगुले तसेच खेड तालुक्यातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला मुस्लिम बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विविध सण-उत्सवांच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांमध्ये संवाद आणि आपुलकी वाढविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.

ॲड. वैभव खेडेकर यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून सामाजिक बांधिलकीची भावना अधोरेखित झाली. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असताना विविध समाजघटकांशी संवाद साधत सामाजिक एकोपा मजबूत करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे यावेळी दिसून आले.

ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या निमित्ताने मुस्लिम बांधवांना पाणी बॉटलचे वाटप करत ‘सण कोणताही असो, माणुसकी आणि बंधुभाव सर्वांत महत्त्वाचा’ असा एकात्मतेचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

Total Visitors :
4762171
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *