खेडमध्ये दोन बिबट्यांच्या हल्ल्यात दोन बकऱ्या ठार

Gramin Varta
49 Views

खेड : रानात चरण्यासाठी नेलेल्या बकऱ्यांवर दोन बिबट्यांनी हल्ला केल्याची घटना खेड तालुक्यातील खापी-गोरेवाडी येथे गुरुवारी (१३ ऑगस्ट) दुपारी घडली. या हल्ल्यात दोन बकऱ्या ठार झाल्या.

बाळाजी बाबू गोरे यांच्या मालकीच्या या बकऱ्या होत्या. त्यांच्या पत्नी गुरुवारी दुपारी बकऱ्यांना चरण्यासाठी रानात घेऊन गेल्या होत्या. त्यावेळी दबा धरून बसलेल्या दोन बिबट्यांनी बकऱ्यांवर अचानक हल्ला केला.

बिबट्यांनी बकऱ्यांवर झडप घातल्यानंतर काही वेळातच दोन्ही बकऱ्या जागीच ठार झाल्या. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी परमेश्वर धोईफोडे आणि वैभव काटखाये यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी परिसराची पाहणी करून घटनेचा पंचनामा केला.

बिबट्यांच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, पाळीव जनावरे रानात चरण्यासाठी नेताना विशेष काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

Total Visitors :
4703437
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *