खेडमधील दहिवली दरडग्रस्त कुटुंबीयांना दिलासा; महसूल मंत्र्यांकडून घर बांधण्यासाठी प्रत्येकी दोन लाखांच्या मदतीची घोषणा

Gramin Varta
237 Views

खेड: महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या रत्नागिरी जिल्हा दौऱ्यादरम्यान खेड तालुक्यातील दहिवली गावातील दरडग्रस्त नागरिकांच्या पुनर्वसनासंदर्भात आणि नुकसानीबाबत महत्त्वाची घडामोड घडली आहे. भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे मा. नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर आणि विधान परिषदेचे आमदार प्रमोद जठार यांच्या पाठपुराव्यामुळे येथील अपघातग्रस्त नागरिकांना तातडीने मोठा दिलासा मिळाला आहे.

दहीवली गावामध्ये दरड कोसळून मोठे नुकसान झाले होते. या आपत्तीमुळे बाधित झालेल्या स्थानिक नागरिकांच्या पुनर्वसनासाठी ॲड. वैभव खेडेकर यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे अधिकृत निवेदन सादर केले होते. या निवेदनाची गंभीर दखल घेत महसूल मंत्र्यांनी तातडीने घर बांधण्यासाठी प्रत्येकी दोन लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. तसेच, बाधित कुटुंबांना आणखी अधिक मदत मिळवून देण्यासाठी रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ सविस्तर अहवाल तयार करून सादर करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

आमदार प्रमोद जठार आणि ॲड. वैभव खेडेकर यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे दहिवली येथील संकटग्रस्त नागरिकांना तातडीची शासकीय मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

- Advertisement -
Total Visitors :
4630966
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *