खेड: गुणंदे येथे जंगलात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Gramin Varta
341 Views

खेड : तालुक्यातील गुणंदे ते मणी जाणाऱ्या रस्त्यालगतच्या जंगलात एका ३७ वर्षीय तरुणाने नायलॉनच्या दोरीने झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. केतन विजय आंब्रे (वय ३७, रा. गुणंदे तांबडवाडी, ता. खेड) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना १७ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६ ते ७.३० या कालावधीत घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुण केतन आंब्रे याने टोकाचे पाऊल उचलत जंगलातील झाडाला गळफास लावून घेतला. ही बाब लक्षात आल्यानंतर नातेवाईकांनी त्याला तातडीने उपचारासाठी कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर १८ जुलै २०२६ रोजी पहाटे ३ वाजता त्याला मृत घोषित केले. या घटनेची नोंद खेड पोलीस ठाण्यात १८ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५.४१ वाजता करण्यात आली असून, पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.

Total Visitors :
4827362
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *