मराठी पत्रकार परिषद रत्नागिरी तालुका कार्यकारीणी जाहीर

Gramin Varta
90 Views

अध्यक्षपदी सतीश पालकर, सचिवपदी जमीर खलफे यांची निवड

रत्नागिरी: मराठी पत्रकार परिषद, तालुका रत्नागिरीच्या नवीन कार्यकारीणीची नुकतीच अधिकृत घोषणा करण्यात आली.
या नवीन कार्यकारीणीमध्ये तालुका अध्यक्षपदाची धुरा ज्येष्ठ पत्रकार सतीश पालकर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे, तर कार्याध्यक्षपदी रहीम दलाल यांची बिनविरोध निवड झाली आहे. संघटनेचे काम अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यासाठी उपाध्यक्ष म्हणून अमोल मोरे आणि शकील गव्हाणकर जबाबदारी सांभाळतील.

परिषदेच्या प्रशासकीय व संघटनात्मक कामकाजाची महत्त्वाची जबाबदारी मुख्य सचिव जमीर खलफे यांच्याकडे देण्यात आली असून, त्यांना सहसचिव म्हणून अवनी पिलणकर सहकार्य करतील. संघटनेचा आर्थिक लेखाजोखा आणि खजिनदारपदाची सूत्रे प्रशांत हरचेकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहेत.सध्याच्या डिजिटल युगात सोशल मीडियाचे महत्त्व ओळखात, सोशल मीडिया प्रमुख म्हणून कांचन मालगुंडकर आणि राजन चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. तालुकाभरातील पत्रकारांना एकत्र आणून संघटन मजबूत करण्यासाठी अमोल डोंगरे आणि विजय बासुतकर हे संघटन प्रमुख म्हणून काम पाहणार आहेत.

संस्थेच्या सांस्कृतिक उपक्रमांना गती देण्यासाठी सचिन बोरकर आणि शुभम पवार यांची सांस्कृतिक प्रमुखपदी नियुक्ती झाली आहे. तसेच, नवनिर्वाचित समितीला वेळोवेळी मार्गदर्शन लाभावे याकरिता भालचंद्र नाचणकर, शोभना कांबळे, विभा कदम आणि संजय वैश्यपायन यांची सल्लागार मंडळात निवड करण्यात आली आहे.याशिवाय कार्यकारीणीचे सदस्य म्हणून मनोज लेले, अजय सावंत, श्रीहरी तांबट, समीर शिगवण, जाकीर पिरजादे आणि अनिकेत पावसकर हे काम पाहणार आहेत.

शासकिय विश्रामगृहात पार पडलेल्या या बैठकीला राज्य उपाध्यक्ष हेमंत वणजू, जिल्हाध्यक्ष आनंद तापेकर, जिल्हा कार्याध्यक्ष राजेश शेळके हे उपस्थित होते. नवनिर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांचे रत्नागिरीतील पत्रकारिता, राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत असून, नवीन कार्यकारीणीमुळे तालुक्यातील पत्रकारांच्या हक्कांना आणि प्रश्नांना अधिक बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

- Advertisement -
Total Visitors :
4762554
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *