प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील यांचे १४ जुलै रोजी मंडणगड येथे प्रेरणादायी व्याख्यान

Gramin Varta
26 Views

मंडणगड: जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था (महाराष्ट्र), रत्नागिरी जिल्हा मंडणगड केंद्र आणि कुणबी समाजोन्नती संघ ग्रामीण शाखा मंडणगड यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, १४ जुलै रोजी सकाळी १० वाजता भिंगळोली येथील गवळी हॉलमध्ये प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील यांचे प्रेरणादायी व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रा. बानगुडे पाटील हे तालुक्यातील विद्यार्थी आणि तरुणांना संघर्षातून यशाकडे जाण्याचा मूलमंत्र देणार आहेत. या कार्यक्रमासाठी संस्था आणि कुणबी समाजोन्नती संघ ग्रामीण शाखा मंडणगडचे कार्यकर्ते गावागावात जाऊन प्रचार व प्रसार करत आहेत.

कार्यक्रमस्थळी दोन ते तीन हजार उपस्थितांसाठी आसनव्यवस्था, ध्वनी व्यवस्था आणि स्क्रीनची विशेष सोय करण्यात आली आहे. तालुक्यातील सर्व शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Total Visitors :
4576140
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *