मंडणगडमध्ये विद्यार्थिनीला अश्लील संदेश पाठवणाऱ्या शिक्षकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

Gramin Varta
391 Views

मंडणगड : तालुक्यात एका अल्पवयीन विद्यार्थिनीला मोबाईलवर आक्षेपार्ह संदेश पाठवून तिचा पाठलाग करणाऱ्या शिक्षकावर मंडणगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक अंकुश गर्जे (वय ४२) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित शिक्षकाचे नाव आहे. या घटनेमुळे शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, पोलिसांनी आरोपी शिक्षकाला ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी हा जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असून, पीडित विद्यार्थिनीशी त्याची ओळख तिच्या भावामुळे होती. अभ्यासाच्या निमित्ताने संपर्क साधण्याच्या बहाण्याने या शिक्षकाने ४ ते ७ जुलै २०२६ या कालावधीत विद्यार्थिनीला अत्यंत अश्लील आणि अयोग्य आशयाचे संदेश मोबाईलवर पाठवले. या प्रकारामुळे पीडित मुलगी मानसिक तणावाखाली आली होती. तिने या संदेशांचे स्क्रीनशॉट काढून आपल्या कुटुंबीयांना दाखवल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. १३ जुलै रोजी पीडितेने आपल्या नातेवाईकांसह मंडणगड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी ‘भारतीय न्याय संहिता’ आणि ‘बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण’ (पोक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक भरत धुमाळ हे करत आहेत.

Total Visitors :
4820545
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *