चिपळूण बाजार पुलावरून नदीत उडी घेतलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला

Gramin Varta
1080 Views

चिपळूण: चिपळूण बाजार पुलावरून वाशिष्ठी नदीत उडी घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणाचा मृतदेह अखेर रविवारी सकाळी कालूस्ते परिसरात आढळून आला. रिजवान बरकार (वय २५, रा. गोवळकोट, चिपळूण) असे मृत तरुणाचे नाव आहे.

शनिवार, ११ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास रिजवानने चिपळूण बाजार पुलावरून नदीत उडी घेतली होती. ही धक्कादायक घटना समजताच चिपळूण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक रेस्क्यू टीमच्या मदतीने नदीपात्रात शोधमोहीम राबवण्यात आली. पुलावर तरुणाची चप्पल आणि कपडे आढळून आले होते. रात्रभर शोधकार्य सुरू ठेवण्यात आले होते, मात्र अंधार आणि नदीच्या प्रवाहामुळे मृतदेह मिळवण्यात अडचणी येत होत्या.

अखेर रविवारी, १२ जुलै रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास कालूस्ते परिसरात मृतदेह तरंगताना दिसून आला. मृतदेह सापडल्यानंतर शोधमोहीम थांबवण्यात आली असून, या घटनेचा पुढील तपास चिपळूण पोलीस करत आहेत.

Total Visitors :
4576810
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *