लांजा वाकेड येथे भरधाव कार डिव्हायडरवर आदळून भीषण अपघात, प्रवासी सुदैवाने बचावले

Gramin Varta
1224 Views

लांजा: मुंबई-गोवा महामार्गावरील लांजा येथे रविवारी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास भरधाव कार डिव्हायडरवर आदळून पलटी झाल्याने मोठा अपघात झाला. या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, सुदैवाने कारमधील सर्व प्रवासी थोडक्यात बचावले.

प्राथमिक माहितीनुसार, भरधाव वेगाने येणाऱ्या कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार थेट महामार्गावरील डिव्हायडरवर आदळली आणि पलटी झाली. अपघाताचा जोर इतका होता की वाहनाचे मोठे नुकसान झाले.
अपघाताची माहिती मिळताच लांजा पोलिस व स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.

सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.

Total Visitors :
4576508
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *