विनायक राऊत यांच्याशी संबंधित प्रकरणात सावंतवाडीतील फिरोज बाबा ताब्यात

Gramin Varta
539 Views

सावंतवाडी: माजी खासदार विनायक राऊत यांच्या सुनेने केलेल्या कथित जादू-टोणा आणि अघोरी प्रथांच्या आरोपांप्रकरणी तपासाला मोठी गती आली आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव येथील फिरोज बाबा याला ठाणे पोलिसांनी सावंतवाडी पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले आहे. तक्रारदार महिलेने आपल्या फिर्यादीमध्ये फिरोज बाबाने आपल्यावर अघोरी विधी आणि जादू-टोणा केल्याचा गंभीर आरोप केला होता. विनायक राऊत, त्यांचा मुलगा गीतेश राऊत आणि इतर आरोपींविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान ही महत्त्वपूर्ण कारवाई करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास आता ठाणे पोलिसांकडून सुरू आहे.

Total Visitors :
4833747
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *