खेड : अल्पवयीन मुला-मुलींवरील अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी पोलिस विभाग आणि तहसील प्रशासनाच्या माध्यमातून शाळा व महाविद्यालयीन स्तरावर व्यापक जनजागृती तसेच समुपदेशन कार्यक्रम राबविण्याची मागणी भारतीय जनता पार्टी, खेडच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, पोलीस उपविभागीय अधिकारी शैलेश सणस आणि खेड पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांना निवेदन देण्यात आले.
खेड परिसरात अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या प्रकरणी नरेश बाबाजी मोरे याच्याविरुद्ध ३ ऑगस्ट २०२६ रोजी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच दिवशी पोलिसांनी त्याला अटक केली होती. या घटनेच्या पार्श्वभूमीवर भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत, यासाठी केवळ कायदेशीर कारवाईबरोबरच अल्पवयीन मुला-मुलींमध्ये सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करणे, त्यांना चांगल्या-वाईट स्पर्शाची माहिती देणे, संशयास्पद वर्तन ओळखणे तसेच कोणत्याही प्रकारच्या त्रासाबाबत पालक, शिक्षक किंवा पोलिसांशी तातडीने संपर्क साधण्याबाबत मार्गदर्शन करणे आवश्यक असल्याचे भाजपच्या वतीने निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
पोलिस विभाग आणि तहसील प्रशासनाने संयुक्तपणे शाळा, महाविद्यालये तसेच ग्रामीण भागात समुपदेशन व जनजागृती कार्यक्रम आयोजित केल्यास अल्पवयीन मुला-मुलींमध्ये आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल आणि लैंगिक अत्याचारासारख्या विकृत प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी प्रभावी वातावरण निर्माण होईल, अशी भूमिका भाजपने मांडली आहे. अशा कार्यक्रमांमध्ये पालक आणि शिक्षकांचाही सहभाग वाढविण्याची मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनावेळी भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर, भाजपा खेड तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, भाजपा खेड शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, भाजपा युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस ॲड. मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर, भाजपा खेड तालुका सरचिटणीस शुभम गायकवाड, भाजपा युवा मोर्चा खेड शहराध्यक्ष स्वराज गांधी, भाजपा खेड उपशहराध्यक्ष प्रणव मापुस्कर, भाजपा खेड शहर सरचिटणीस विजय गुप्ता, भाजपा खेड शहर चिटणीस अनिकेत पवार, भाजपा सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार, तुषार पवार, सुयश उर्फ बॉबी खेडेकर, बाळू वर्मा, प्रथमेश सुर्वे आणि अमित खेडेकर उपस्थित होते.
अल्पवयीन मुला-मुलींच्या सुरक्षेसाठी समुपदेशन कार्यक्रम राबविण्याची भाजपची मागणी
Leave a Comment






