विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीला मदतीचा हात; संगमेश्वर तालुक्यातील दोन शाळांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

Gramin Varta
89 Views

संगमेश्वर : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून हार्दिक जायगडे मित्र परिवार व युवा संकल्पना यांच्या संयुक्त विद्यमाने संगमेश्वर तालुक्यातील दोन जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध झाले असून, त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.

या उपक्रमांतर्गत जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा, फणसवळे शाळा क्र. १, मु. फणसवळे, पो. देवळे तसेच जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा, सांगवे, मु. पो. सांगवे येथील विद्यार्थ्यांना विविध आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी लागणाऱ्या साहित्याची कमतरता भासू नये आणि त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमासाठी मितेश घडशी व प्रशांत पवार यांनी विशेष पुढाकार घेतला.

यावेळी निलेश गुरव, विक्रम काटकर, गणेश भुवड, संदेश गुरव, ऋषी शेलार आणि विशाल गायकवाड यांची उपस्थिती लाभली. उपक्रम यशस्वी करण्यासाठी उपस्थितांनी मोलाचे सहकार्य केले.

- Advertisement -

शैक्षणिक साहित्य मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि त्यांचा उत्साह या उपक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक सुविधा व साधने उपलब्ध करून देण्यासाठी अशा सामाजिक उपक्रमांची गरज असल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला हातभार लावणारे विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रम भविष्यातही सातत्याने राबविण्याचा मानस आयोजकांनी व्यक्त केला.

Total Visitors :
4763680
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *