संगमेश्वर : विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड वाढावी तसेच त्यांना शैक्षणिक साहित्याची कमतरता भासू नये, या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सरपंच दैवत रविंद्र पवार व रणजीत रविंद्र पवार यांच्या वतीने निवळी जिल्हा परिषद मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना स्वखर्चाने शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना पेन्सिल, पाट्या, पट्ट्या तसेच इतर आवश्यक शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. या साहित्याचे वाटप सरपंच दैवत रविंद्र पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत अधिकारी केशव पालवे, शाळेचे मुख्याध्यापक किरण घाणे सर, सुशांत वैरागड सर, माजी शिक्षक कुवळेकर गुरुजी, माजी तंटामुक्ती अध्यक्ष काशिराम घडशी, तंटामुक्ती अध्यक्ष आत्माराम घडशी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजीव भिकाजी पवार, उपाध्यक्षा मनाली कुवळेकर, माजी उपसरपंच शांताराम घडशी (मामा), माजी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कृष्णा बदड, ग्रामपंचायत शिपाई परशुराम धांगडे, अंगणवाडी सेविका कुवळेकर मॅडम, रुंजी पवार,श्रीमती अलका पवार यांच्यासह पालकवर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते.
मुख्याध्यापक किरण घाणे सर यांनी या उपक्रमाचे कौतुक करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी दाखविलेल्या सामाजिक बांधिलकीबद्दल सरपंच दैवत रविंद्र पवार व रणजीत रविंद्र पवार यांचे मनःपूर्वक आभार मानले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळते आणि त्यांच्या मनात शिक्षणाविषयी सकारात्मक भावना निर्माण होते, असे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे ग्रामस्थ व पालकवर्गातून कौतुक होत आहे.
संगमेश्वर : निवळी जिल्हा परिषद मराठी शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
Leave a Comment






