चाकूचा धाक दाखवून ऑनलाइन लुटीचा प्रयत्न; खेड पोलिसांकडून काही तासांतच आरोपींना अटक

Gramin Varta
363 Views

खेड: खेड-दापोली मार्गावरील कुवे घाट परिसरात चाकूचा धाक दाखवून एका व्यक्तीला लुटण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी खेड पोलिसांनी अवघ्या काही तासांत दोघा संशयितांना जेरबंद केले आहे. दापोलीहून खेडच्या दिशेने येत असताना एका व्यक्तीने लिफ्ट मागितली होती. मात्र, वाहन कुवे घाटात पोहोचताच गाडीतील दोन प्रवाशांनी चाकूचा धाक दाखवून पीडित व्यक्तीच्या मोबाइलवरून बळजबरीने ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करून घेतले. लूटमार केल्यानंतर आरोपींनी पीडितेला मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील हॅप्पी ढाबा परिसरात उतरवून पळ काढला.

या घटनेची माहिती मिळताच खेड पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश सणस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे शोधमोहीम राबवून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. अटकेतील संशयितांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, पुढील तपास खेड पोलीस करत आहेत.

Total Visitors :
4827723
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *