चार दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर शेणाळे घाट वाहतुकीसाठी पूर्ववत

Gramin Varta
125 Views

मंडणगड: मुसळधार पावसामुळे शेणाळे घाटातील देशमुखबाग परिसरात कोसळलेली मोठी दरड हटवण्यात यश आल्याने हा घाटमार्ग अखेर शनिवारी सायंकाळी वाहतुकीसाठी पुन्हा खुला झाला आहे. गेल्या चार दिवसांपासून या घाटातील दरडीमुळे वाहतूक पूर्णपणे बंद होती, ज्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने युद्धपातळीवर काम करत जेसीबी आणि इतर यंत्रसामग्रीच्या साहाय्याने रस्त्यावर साचलेली माती, दगड व झाडे हटवली. तहसीलदार अक्षय ढाकणे यांनीही प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून कामाचा आढावा घेतला आणि आवश्यक त्या सूचना दिल्या.

या दरडीमुळे मुंबई, पुणे, महाड आणि माणगावला जाणारी वाहतूक ठप्प झाली होती, तसेच मंडणगड व दापोली तालुक्यांचा अन्य भागांशी असलेला संपर्क तुटला होता. आता रस्ता मोकळा झाल्याने वाहतूक सुरळीत झाली असून, नागरिक व वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले आहे. पर्यायी मार्गांचा वापर करणाऱ्या वाहनचालकांनाही यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

Total Visitors :
4820518
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *