संगमेश्वर बाजारपेठेत लिटिल एंजल प्री स्कूलतर्फे वारकरी दिंडी उत्साहात संपन्न

Gramin Varta
36 Views

संगमेश्वर : येथील लिटिल एंजल प्री स्कूलच्या वतीने संगमेश्वर बाजारपेठेतून एका भव्य वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. विठ्ठल नामाचा जयघोष आणि टाळ-मृदंगाच्या गजरात निघालेल्या या दिंडीने संपूर्ण परिसरात चैतन्य निर्माण केले होते.
या दिंडीमध्ये शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी वारकरी संप्रदायाचा पेहराव परिधान करत प्रत्यक्ष वारकरी आणि विठ्ठल-रखुमाईचे रूप धारण केले होते. हातात भगव्या पताका आणि टाळ घेऊन लहान मुलांनी विठ्ठल नामाचा जयघोष करत अत्यंत उत्साहात आणि आनंदात सहभाग घेतला. ही दिंडी शाळेपासून सुरू होऊन पाग आळी तिठ्यापर्यंत काढण्यात आली. चिमुकल्यांच्या दिंडीला नागरिकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला.

या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांसोबतच पालकांनी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. दिंडीच्या यशस्वी आयोजनासाठी नूतन लक्ष्मीकांत खातू, निकीता शांतनु शेट्ये, साक्षी शशांक खातू, स्नेहल चव्हाण शिंदे, माधवी शिंदे आणि सर्व पालकांनी विशेष सहकार्य केले. विठ्ठलमय वातावरणात पार पडलेल्या या दिंडीमुळे संगमेश्वर बाजारपेठेत भक्तिमय व उत्साहपूर्ण माहोल पाहायला मिळाला.

Total Visitors :
4820686
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *