डॉ. श्रीधर ठाकुरदेसाई यांच्या हस्ते उदघाटन ; प्रदर्शनात निसर्गाची विविध रूपं पाहण्याची संधी
संगमेश्वर : कोकणातील अग्रगण्य चित्र–शिल्प कलामहाविद्यालय सह्याद्रि स्कूल ऑफ आर्ट, सावर्डे येथे विद्यार्थ्यांनी साकारलेल्या विविध चित्र व शिल्प कलाकृतींच्या पावसाळी कला प्रदर्शनाचे उद्घाटन सोमवार, दि. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.
सह्याद्रि शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी पावसाळ्यातील कोकणचा निसर्ग, हिरवाई, डोंगर-दऱ्या, जलस्रोत तसेच विविध विषयांवर साकारलेल्या कलाकृती मांडण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच त्यांच्या कलाकृतींना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान गुलाबराव सुर्वे (संचालक -सह्याद्रि शिक्षण संस्था ) यांनी भूषविले तर उद्घाटक म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. श्रीधर ठाकुरदेसाई उपस्थित होते.जेष्ठ चित्रकार – शिल्पकार मा. प्रा. प्रकाश अर्जुन राजेशिर्के ( चेअरमन – सह्याद्रि स्कूल ऑफ आर्ट-सावर्डे ) यांची प्रमुख उपस्थिती होती.तसेच प्राचार्य लकेश्री , प्राचार्य. वाघचौरे , प्राचार्य. गावडे , प्राचार्य. सुनीतकुमार पाटील , प्राचार्य. कांबळे , प्राचार्य. भुरण मॅडम, सौ. जोगळेकर मॅडम, मिलिंद जोगळेकर सर व पालकवर्ग उपस्थित होते.
कार्यक्रमाचे निमंत्रक प्राचार्य प्रा. माणिक यादव यांनी प्रदर्शनाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली.या कार्यक्रमा प्रसंगी बोलताना डॉ. श्रीधर ठाकुरदेसाई म्हणाले की, विद्यार्थ्यांनी शिकत असताना निरीक्षण क्षमता वाढावा आपल्या आजूबाजूला जे कोणी तज्ञ कलाशिक्षक चित्रकार आहेत. त्यांचा खूप वर्षांचा अनुभव आपल्या आचरणात आणा तर आपण मोठे चित्रकार होवू शकाल.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून गत वर्षी मूलभूत अभ्यासक्रम विभागात उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या आणि सलग तीन वर्ष याच महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यास सौ. प्रज्ञा मिलिंद जोगळेकर (प्रमुख सल्लागार, ग्रामकौशल फाउंडेशन, चिपळूण) यांच्यातर्फे शिष्यवृत्ती देण्यात आली हि शिष्यवृत्ती कु. श्रेयस घुमे याला प्रदान करण्यात आली. या प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी विविध माध्यमांतून साकारलेल्या चित्र व शिल्प कलाकृतींचे आकर्षक पद्धतीने प्रदर्शन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचा, कलात्मक दृष्टिकोनाचा आणि कौशल्याचा प्रत्यय या कलाकृतींतून आला.
कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे कौतुक म्हणून त्यांच्या चित्र- शिल्पांना पारितोषिके देण्यात आली
प्रदर्शनात मांडलेल्या चित्र शिल्पांचे परीक्षण चित्रकार प्रविण मिसाळ यांनी केले.यातून सर्वोत्कृष्ट कलाकृती-सौरभ साठे(पेंटींग विभाग), उत्कृष्ट शैक्षणिक प्रात्यक्षिक -सौरभ साठे -(पेंटिंग )उत्कृष्ट कलाकृती- कश्मीरा नरवणकर(पेंटिंग विभाग), उत्कृष्ट कलाकृती -सुयश राडे(ए.टी. डी विभाग),उत्कृष्ट कलाकृती-शिवम नलावडे-(शिल्पकला),उत्कृष्ट कलाकृती-शुभम लिबे -(ए. टी. डी ),उत्कृष्ट कलाकृती-साहिल परुळेकर -(शिल्पकला ),उत्कृष्ट कलाकृती-ओमकार मेस्त्री-(शिल्पकला),उत्कृष्ट कलाकृती -कुणाल शिगवण-(शिल्पकला) ,उत्कृष्ट कलाकृती-ज्योती पांचाळ (शिल्पकला), विशेष कलाकृती- कश्मीरा नरवणकर-( पेंटिंग),विशेष कलाकृती- सिद्धार्थ भोवड-(पेंटिंग), विशेष कलाकृती- ओम बामुगड-(पेंटींग), विशेष कलाकृती-मंथन कांबळे-(ए. टी. डी.), विशेष कलाकृती-रुचित सांगळे-(शिल्पकला), विशेष कलाकृती-पंकज सुतार -(शिल्पकला) यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
या सर्व विद्यार्थ्यांचे चिपळूण–संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा सह्याद्रि शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आमदार शेखर गोविंदराव निकम तसेच, मा. डॉ. इसाक महंमद खतिब (उपाध्यक्ष-सह्याद्रि शिक्षण संस्था ), मा. सौ. युगंधरा प्रकाश राजेशिर्के (उपाध्यक्ष-सह्याद्रि शिक्षण संस्था ), प्रशांत गोविंदराव निकम (उपाध्यक्ष-सह्याद्रि शिक्षण संस्था ), अनिरुद्ध शेखर निकम (कार्याध्यक्ष -सह्याद्रि शिक्षण संस्था ), महेश मनोहर महाडिक ( सेक्रेटरी – सह्याद्रि शिक्षण संस्था ) कौतुक आणि शुभेच्छा दिल्या. सह्याद्रि कलादालन, सह्याद्रि स्कूल ऑफ आर्ट, सावर्डे, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी येथे हे प्रदर्शन दि. ३१ ऑगस्ट २०२६ ते ४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत भरविण्यात आले आहे. प्रदर्शनाची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहे.या प्रदर्शनास कलाप्रेमी, कलारसिक, विद्यार्थी व नागरिकांनी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे कौतुक करावे असे आवाहन कलामहाविद्यालयाचे प्राचार्य. माणिक यादव यांनी केले आहे..
सह्याद्रि स्कूल ऑफ आर्टच्या पावसाळी कला प्रदर्शनास प्रारंभ
Leave a Comment






