संगमेश्वर :सासऱ्याच्या तक्रारीचा राग मनात धरून घरच्या जेवणात विषारी द्रव मिसळून खूनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना संगमेश्वर तालुक्यातील कोसुंब-रेवाळेवाडी येथे उघडकीस आली. याप्रकरणी आरोपी सुनबाईला अटक करून शनिवारी देवरूख न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने तिला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
प्राथमिक माहितीनुसार, जगन्नाथ सोलकर हे आपल्या सुनबाई स्वप्नाली सोलकर हिला घरातील कामे वारंवार सांगत असत. या त्रासाला कंटाळून तिने सासऱ्याच्या जेवणात विषारी द्रव मिसळले, असा आरोप आहे. या विषबाधित जेवणामुळे जगन्नाथ सोलकर आणि साजन सोलकर या दोघांनाही विषबाधा झाली असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
स्वप्नाली सोलकर हिच्याविरुद्ध देवरूख पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर लगेचच तिला अटक करण्यात आली. शनिवारी तिला न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली.
देवरुख : सासऱ्याला अन्नातून विष घालणाऱ्या सुनेला दोन दिवसांची पोलीस कोठडी
