राजापूर : तालुक्यातील कशेळी येथील सूर्यमंदिराजवळ पतीने आपल्या पत्नीला मारहाण करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मारहाणीत पत्नीचा डावा हात फ्रॅक्चर झाला आहे. पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १३ जून रोजी मध्यरात्री १.०० ते १.३० वाजण्याच्या सुमारास घडली.
या प्रकरणी शुभांगी भोईर (वय ४२, सध्या रा. रुखुमाबाई चाळ, देवीचापाडा, सत्यवान चौक, डोंबिवली पश्चिम, मुंबई, मूळ रा. कशेळी ता. राजापूर) यांनी नाटे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी शुभांगी भोईर आणि आरोपी तुषार एकनाथ मिस्त्री हे पती-पत्नी आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजापूर कोर्टात जमिनीच्या केससंदर्भात तारखेला हजर राहून घरी कशेळी येथे परतल्यानंतर, आरोपी तुषार मिस्त्रीने फिर्यादी शुभांगी यांना शिवीगाळ केली आणि घराबाहेर काढले. त्यानंतर स्टीलच्या पाण्याच्या बाटलीने त्यांच्या डाव्या हातावर मारहाण केली, ज्यात त्यांच्या हाताचे मधले बोट फ्रॅक्चर झाले. मारहाण केल्यानंतर आरोपीने त्यांना कोणताही उपचारासाठी नेले नाही. घटनास्थळावरून निघून गेला.
नाटे पोलिसांनी तुषार मिस्त्री याच्यावर गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
राजापूर : नाटे येथे पतीकडून पत्नीला बेदम मारहाण; हात फ्रॅक्चर

Leave a Comment