GRAMIN SEARCH BANNER

सामूहिक जागा हडप करण्यासाठी खड्डे पाडण्याची अनोखी शक्कल, काब्दुले कुटुंबाचा आरोप

Gramin Search
7 Views

मोक्याची जमीन खड्डे पाडून लाटण्याचा प्रयत्न करणाऱ्या तुकाराम काब्दुले विरोधात कुटुंबाची तंटामुक्ती मध्ये तक्रार

वांझोळे:- सामूहिक जागा हडप करण्यासाठी त्या जमिनीत खड्डे पाडण्याची अनोखी शक्कल लढवण्याचा प्रकार समोर आला आहे.करंबेले तर्फे देवळे येथील सामूहिक सातबाराच्या जमिनीत परस्पर दादागिरी करून खड्डे पाडणाऱ्या तुकाराम काब्दुले याच्या विरोधात त्याच्या अन्य भावांनी तंटामुक्ती मध्ये तक्रार दाखल केली असून कुटुंबाने हे खड्डे बुजवून कुटुंबाची जमीन बळकवणाऱ्या विरोधात आता कायदेशीर कारवाईची तयारी केली आहे.

रस्त्याच्या बाजूची मोक्याची जागा तुकाराम काब्दुले याला हडप करायची आहे, असा आरोप आता काब्दुले कुटुंबाने केला आहे.स्वतः कुटुंबातील कोणतेही सदस्याला विश्वासात न घेता चोरून खड्डे पाडणाऱ्या तुकाराम काब्दुले याच्या विरोधात जयवंत काब्दुले यांनी तंटामुक्ती समितीमध्ये तक्रार अर्ज दाखल केला आहे.या तक्रारीवर सोमवारी बैठक आयोजित करण्यात आली आहे. एकीकडे हे होत असताना प्रशांत काब्दुले यांनी खड्डे चोरीला गेल्याचा कांगावा करत स्वतःची चोरी लपवण्याचा प्रयत्न केला आहे असे मत काब्दुले कुटुंबातील सदस्यांनी व्यक्त केले आहे.कुटुंबातील एकत्रित जागेचा वाटप न करता रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या मोक्याच्या जागेवर तुकाराम काब्दुले यांनी डोळा ठेवून परस्परती जमीन लाटण्यासाठी तुकाराम काब्दुले आणि त्याच्या मुलांनी 43 खड्डे पाडले होते.कुटुंबातील सदस्यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याला जाब विचारत सामूहिक जमीन असल्याने ते खड्डे बुजवले व त्या विरोधात तंटामुक्ती समितीमध्ये अर्ज करण्यात आला आहे. कुटुंबाची परवानगी न घेता व जागा न वाटप करता परस्पर खड्डे कसे पाडले याचा जाब कुटुंबातील सदस्यांनी तुकाराम काब्दुले याला विचारला असल्याचे काब्दुले कुटुंबातील सदस्यांनी सांगितले.

सामूहिक जागा हडप करण्यासाठी खड्डे पाडले का? असा सवालही आता काब्दुले कुटुंबाने तुकाराम काब्दुले केला आहे.

Total Visitor Counter

2647128
Share This Article