खेड :तालुक्यातील साखर गावचे सुपुत्र व मुंबई पोलीस दलातून सेवानिवृत्त झालेल्या मनोहर दगडू धनावडे यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुंबई राजभवन येथे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्याहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पोलीस दलात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत दुसऱ्यांदा राष्ट्रपती पुरस्काराने गौरवण्यात आले. यापूर्वी 2018 मध्ये तत्कालीन राज्यपाल विद्यासागर राव व तत्कालीन गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांया हस्ते सन्मानित करण्यात आले होते. पोलीस दलात उत्तम कामगिरी करत ते सेवानिवृत्त झाले आहेत. राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
खेडमधील सेवानिवृत्त पोलिस मनोहर धनावडे दुसऱ्यांदा राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित
