रत्नागिरी: शहरातील सुरेशा पॉईंट परिसरात गांजाचे सेवन करणाऱ्या दोन तरुणांवर रत्नागिरी शहर पोलिसांनी कारवाई केली आहे. गुरुवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली असून, पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध अमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
तफहीन तन्वीर मुजावर (वय २१, रा. कोकणनगर, रत्नागिरी) आणि सफवान शफिक अलजी (वय २१, रा. अजमेरीनगर, रत्नागिरी) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
पोलीस गस्तीवर असताना, ३१ जुलै रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास सुरेशा पॉईंट येथे हे दोन्ही तरुण गांजाचे सेवन करत असल्याचे पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी तात्काळ त्यांना ताब्यात घेतले. यानंतर, पोलिसांनी त्यांच्यावर अमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. शहरातील अशा घटनांमुळे तरुणाईमध्ये व्यसनाधीनता वाढत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.