GRAMIN SEARCH BANNER

खेडमध्ये तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Gramin Varta
339 Views

खेड: खेड तालुक्यातील असगणी, मेटे मोहल्ला येथे एका २९ वर्षीय तरुणाने खोलीमध्ये गळफास घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना १३ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री घडली आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आतिश अशोक दिवेकर (वय २९, रा. मेटे मोहल्ला, पोष्ट असगणी, ता. खेड, जि. रत्नागिरी) या तरुणाने १३ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री १०.३० ते १२.०० वाजेच्या दरम्यान आत्महत्या केली. त्याने आपल्या राहत्या खोलीचे दार आतून बंद केले आणि खोलीतील लाकडी भालाला भगव्या रंगाच्या नायलॉन साडीच्या सहाय्याने गळफास लावून घेतला.

ही घटना दुसऱ्या दिवशी उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी १४ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १२.२७ वाजता या घटनेची नोंद केली आहे.

सध्या खेड पोलीस ठाण्यात अमू. क्रमांक १०५/२०२५ भारतीय नागरी सुरक्षा संहिता (BNSS) १९४ प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तरुणाच्या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून, घटनेचा अधिक तपास सुरू आहे. या तरुणाच्या अकाली मृत्यूमुळे मेटे मोहल्ला परिसरात शोककळा पसरली आहे.

Total Visitor Counter

2645205
Share This Article