GRAMIN SEARCH BANNER

चिपळूण आगाराचे वेळापत्रक कोलमडले

चिपळूण : येथील एसटी आगारात चालक-वाहक आणि वाहतूक नियंत्रकांची अपुरी संख्या, इंधन भरण्यासाठी बसला लागणारा वेळ आणि नियोजनाचा अभाव यामुळे चिपळूण आगाराचे वेळापत्रक विस्कटले आहे.

चालक-वाहकांअभावी आगाराच्या प्रवासी वाहतुकीवर परिणाम होत असून, अनेक बसफेऱ्या रद्द करण्याची नामुष्की आगार प्रशासनावर येत आहे. काही फेऱ्या दररोज विलंबाने धावत आहेत. त्यामुळे ग्रामीण विद्यार्थी, प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. येथील बसस्थानकातही सोयीसुविधांचा अभाव आहे. नव्या बसस्थानकाचे काम सुरू आहे. त्यामुळे अपुरी बैठक व्यवस्था, त्यात पावसाचा त्रास सहन करत प्रवाशांना गाड्यांच्या प्रतीक्षेत तासनतास उभे राहावे लागते. बसस्थानकात पोलिसचौकीही नाही. शौचालयातही दुर्गंधीची समस्या वारंवार निर्माण होत असते. बसस्थानक आवार खासगी वाहनांचे पार्किंगस्थळ बनले आहे. दुचाकीसह चारचाकी वाहने एसटीच्या आवारात लागलेल्या असतात. याकडे एसटी प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. या आगारातून दररोज ३१२ बसफेऱ्या धावतात. चिपळूण आगारात ११० बस उपलब्ध आहेत. अजून ३५ बसची आवश्यकता आहे. एकूण कर्मचारी संख्या ४०० पर्यंत आहे. त्यात चालक आणि वाहक २००च्या आसपास आहेत. ४० कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. याचा परिणाम आगाराच्या प्रवाशी वाहतूक सेवेवर होत आहे. चालक-वाहकांची संख्या कमी असल्याने या आगारात कर्मचाऱ्यांची रिबूक ड्युटीचे प्रमाण वाढले आहे. (रिबूक म्हणजे चालक-वाहक एक ड्यूटी केल्यानंतर त्यांना दुसरी ड्यूटी लावली जाते.) मात्र बऱ्याचदा काही कर्मचारी डबल ड्यूटी करण्यास तयार नसतात. पर्यायी कर्मचारीच नसल्याने काही बसफेऱ्या अचानक रद्द करण्याची वेळ येते. अनेकदा वेळेत बस नसल्याने खासगी वाहनांचा आधार घेत प्रवाशांना घर गाठावे लागते, यात त्यांची मोठी आर्थिक परवड होते. चिपळूण – पोफळी मार्गावर सायंकाळी धावणारी बसफेरी तर गेल्या पंधरा दिवसात चार ते पाच दिवस अचानक रद्द करण्यात आली. कधी कधी ही फेरी उशिराने धावते. त्यामुळे या मार्गावरील विद्यार्थ्यांसह प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतो. ही फेरी नियमित करावी, अशी मागणी या मार्गावरील प्रवाशांमधून केली जात आहे. या आगारातून दररोज ३१२ बसफेऱ्या धावतात. चिपळूण आगारात ११० बस उपलब्ध आहेत. अजून ३५ बसची आवश्यकता आहे. एकूण कर्मचारी संख्या ४०० पर्यंत आहे. त्यात चालक आणि वाहक २००च्या आसपास आहेत. ४० कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. याचा परिणाम आगाराच्या प्रवाशी वाहतूक सेवेवर होत आहे. चालक-वाहकांची संख्या कमी असल्याने या आगारात कर्मचाऱ्यांची रिबूक ड्युटीचे प्रमाण वाढले आहे. (रिबूक म्हणजे चालक-वाहक एक ड्यूटी केल्यानंतर त्यांना दुसरी ड्यूटी लावली जाते.) मात्र बऱ्याचदा काही कर्मचारी डबल ड्यूटी करण्यास तयार नसतात. पर्यायी कर्मचारीच नसल्याने काही बसफेऱ्या अचानक रद्द करण्याची वेळ येते. अनेकदा वेळेत बस नसल्याने खासगी वाहनांचा आधार घेत प्रवाशांना घर गाठावे लागते, यात त्यांची मोठी आर्थिक परवड होते. चिपळूण – पोफळी मार्गावर सायंकाळी धावणारी बसफेरी तर गेल्या पंधरा दिवसात चार ते पाच दिवस अचानक रद्द करण्यात आली. कधी कधी ही फेरी उशिराने धावते. त्यामुळे या मार्गावरील विद्यार्थ्यांसह प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतो. ही फेरी नियमित करावी, अशी मागणी या मार्गावरील प्रवाशांमधून केली जात आहे.

Total Visitor

0224928
Share This Article