युवक युवतीच्या हाताला देणार काम; महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाचा निर्धार
राजापूर : पॅरामेडिकल क्षेत्रात नोकऱ्यांचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. आरोग्य सेवा क्षेत्रात डॉक्टर आणि नर्स यांना मदत करणाऱ्या कुशल व्यावसायिकांची नेहमीच मोठी मागणी असते. कोरोना नंतर आणखीन जास्त मागणी वाढली आहे. त्यामध्ये *DMLT*, *x – ray technician*, *MRI* *technician* सारखे हमखास जॉब देणारे डिप्लोमा msbve या मंडळाचा उभे केले आहे. तसेच नर्सिंग होम, क्लिनिक आणि आरोग्य सेवा केंद्रामध्ये या नोकऱ्या मिळतात. विशेषत: आपत्कालीन सेवा, प्रयोग शाळा तंत्रज्ञान, x-ray आणि MRI तंत्रज्ञान यासारख्या विविध क्षेत्रामध्ये रोजगार उपलब्ध आहेत. याचप्रमाणे सरकारी तसेच खासगी रुग्णालये आणि नर्सिंग होम मध्ये पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांची पॅरामेडिकल अभ्यासक्रमुळे आरोग्य सेवा क्षेत्रात अनेक संधी मिळतात. ज्यामुळे नोकरीची स्थिरता आणि चांगली करिअर वाढ होते.
या क्षेत्रातील वाढती मागणी पाहता, पॅरामेडिकल प्रशिशन घेतलेल्या व्यक्तींना त्यांच्या अभ्यासक्रमाच्या समाप्तीनंतर लगेच नोकरी मिळण्याची शक्यता असते. शासनाच्या वतीने या सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की जवळच्या मान्यता प्राप्त संस्थान ला भेट देऊन व्यवसाय शिक्षण मंडळ व प्रशिक्षण संस्था अधिक ते अधिक युवक युवतींनी भेट द्यावी. त्यापैकी राजापूर तालुक्यात वाटूळ येथे असलेले *रॅलिस पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट* यापैकी एक आहे. त्याच बरोबर या क्षेत्रात पुढील उच्च शिक्षणाच्या संधी देखील उपलब्ध आहेत.
पॅरामेडिकल कोर्स केल्यानंतर मला सरकारी नोकरी मिळू शकते का.?
होय.. या पॅरामेडिकल कोर्स केल्यानंतर सरकारी व निमसरकारी रुग्णालयामध्ये किंवा लॅब Technican आणि असेच दहावीनंतर किंवा बारावी नंतर DMLT, X-ray Technician, MRI Technician, लोकप्रिय डिप्लोमा कोर्स व पॅरामेडिकल अभ्यासक्रम आहेत. आरोग्य आणि मलेरिया निरीक्षक, बाहेर देशामध्ये जाण्याचा किंवा स्वतःची लॅब व इतर अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
कोणत्याही पॅरामेडिकल क्षेत्रात किंवा विषयात बॅचलर पदवी किंवा डिप्लोमा पूर्ण केलेले विद्यार्थी या नोकरीसाठी पात्र आहे. पण ती डिप्लोमा किंवा डिग्री महाराष्ट्र राज्य शासन मान्य प्राप्त संस्थान मधून असायला पाहिजे तर विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळू शकते आणि त्यांच्या हाताला रोजगार उपलब्ध होऊ शकतात.
आता पॅरामेडिकल क्षेत्रात निर्माण होतायत अनेक रोजगाराच्या संधी
