क्रेडिट एक्सेस ग्रामीण लिमिटेड आणि क्रेडिट एक्सेस इंडिया फाउंडेशन यांचे आयोजन
रत्नागिरी : क्रेडिट एक्सेस ग्रामीण लिमिटेड (ग्रामीण कुटा) आणि क्रेडिट एक्सेस इंडिया फाउंडेशन (सीएआयएफ) यांच्या सहकार्याने रत्नागिरी येथे सामाजिक-आर्थिक विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचा केंद्रबिंदू आर्थिक साक्षरता व ग्रामीण समुदायाचे सक्षमीकरण हा होता.
सिद्धिविनायक मंगल कार्यालयात पार पडलेल्या या कार्यशाळेत दोनशेहून अधिक महिला, अधिकारी व संस्थेचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. प्रमुख अतिथी म्हणून रत्नागिरी तहसीलदार राजाराम म्हात्रे, रत्नागिरी पोलीस स्टेशनच्या उपनिरीक्षक प्रियंका देसाई, चांदराई आरोग्य केंद्राच्या अधिकारी डॉ. शितल सूर्यवंशी आणि विभागीय व्यवस्थापक वैभव धर्मे उपस्थित होते.
वैभव धर्मे यांनी कार्यशाळेचे उद्दिष्ट स्पष्ट करताना जबाबदारीने कर्ज घेणे, क्रेडिट शिस्त पाळणे, डिजिटल फसवणुकीपासून संरक्षण करणे, तसेच आर्थिक सक्षमीकरणासाठी जागरूकता आणि क्षमतेचा विकास याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेच्या सीएसआर फंडाबाबतही माहिती देण्यात आली.
राजाराम म्हात्रे यांनी ग्रामीण भागातील आर्थिक शिक्षणाचे महत्व अधोरेखित केले. प्रियंका देसाई यांनी महिलांना डिजिटल फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन केले, तर डॉ. सूर्यवंशी यांनी आरोग्याबाबत दक्ष राहण्याचे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लेखापरीक्षण विभागीय अधिकारी नितेश संकपाळ यांनी केले
सहभागी महिला सदस्यांनी मनोगत व्यक्त केले. एरिया मॅनेजर सिद्धाप्पा कुन्नूरे यांनी आभार मानले.
या कार्यक्रमाला एरिया मॅनेजर शिवानंद सोनटक्के, सुरज कुराडे, शाखा व्यवस्थापक सिद्धेश टाकळे, श्रुतिका शिवलकर, अनिल कांबळे, प्रथमेश घाडी, विजय बोडेकर, कपिल पवार, शुभम गुरव, किशोर चौधरी, सुरज फटकरे, प्रशांत आंबवले तसेच संस्थेचे इतर पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते
रत्नागिरीत आर्थिक साक्षरता व समुदाय सक्षमीकरण कार्यशाळा
