GRAMIN SEARCH BANNER

वरवडे विद्यालय व खंडाळा बापट कनिष्ठ महाविद्यालयात थोर देणगीदार कद्रेकर भगिनींचा शिक्षण संस्थेतर्फे सत्कार

जाकादेवी : रत्नागिरी तालुक्यातील वरवडे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ वरवडे संचलित माध्यमिक विद्यालय वरवडे भागशाळा व श्रीमती पार्वती शंकर बापट कनिष्ठ महाविद्यालय वाटद-खंडाळा येथे इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या विशेष सत्कार समारंभात वरवडे शाळेला वर्गखोली बांधकामासाठी दहा लाख रुपये देणगी दिलेल्या कद्रेकर भगिनींचा शिक्षण संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र विचारे, तर प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती शालिनी भार्गव कद्रेकर व त्यांच्या भगिनी शकुंतल कद्रेकर, नामांकित वकील ॲड.एस.एम.देसाई, श्री मनोहर विचारे आणि सौ.सुकेशनी शशिकांत सावंत हे उपस्थित होते.

सर्वप्रथम श्रीमती शालिनी भार्गव कद्रेकर यांच्या हस्ते शाळेला दिलेल्या दहा लाख रुपयांच्या निधीतून बांधण्यात आलेल्या वर्गखोलीच्या भित्तीपत्रकाचे अनावरण करण्यात आले.

यानंतर मार्च २०२५ मध्ये झालेल्या बोर्ड परीक्षेमध्ये इयत्ता दहावीमध्ये प्रथम आलेले तीन विद्यार्थी –

कु. आर्या संतोष बोरकर
कु. प्रणव रमेश बळकटे
कु. स्वरदा राम साठे

*वरवडे शाळेतून प्रथम आलेले विद्यार्थी*

◼️कु. आर्या संतोष बोरकर
◼️कु. आर्या प्रवीण पावसकर
◼️कु. वर्षा मनोज खापले

*इयत्ता बारावी (विज्ञान शाखा) मध्ये प्रथम आलेले विद्यार्थी*

◼️कु. तनिष्का रविकांत पवार
◼️कु. विशाल विठ्ठल मोरे
◼️कु. वैष्णवी राजन पेडणेकर

*इयत्ता बारावी (वाणिज्य शाखा) मध्ये प्रथम आलेले विद्यार्थी*

◼️कु. शर्वरी प्रभाकर शिर्के
◼️कु. चैतन्य रमेश जुवेकर
◼️कु. अनिकेत गजानन जुवेकर

या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला आणि त्यांना बक्षिसे वितरित करण्यात आली.

कार्यक्रमादरम्यान चाफेरी गावचे सुपुत्र व सध्या अमेरिकेत स्थायिक असलेले व्यवसायिक श्री.सुशांत शशिकांत सावंत यांच्या वतीने, त्यांच्या आई सौ. सुकेशनी शशिकांत सावंत यांच्या हस्ते शाळेतील आर्थिकदृष्ट्या गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, वह्या व छत्री यांचे वाटप करण्यात आले.

ॲड.देसाई सर व शाळेचे मुख्याध्यापक श्री.शिवाजीजगताप यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक शिक्षक श्री.प्रभाकर धोपट यांनी केले, तर संस्थेचे कोषाध्यक्ष श्री.दिवाकर जोशी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र विचारे, सचिवश्री.समीर बोरकर, कोषाध्यक्ष श्री.दिवाकर जोशी, संस्थेचे संचालक श्री.संदीप सुर्वे, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Total Visitor Counter

2455624
Share This Article