GRAMIN SEARCH BANNER

तलाठ्याच्या उद्धट वर्तनाविरोधात तहसीलदारांकडे तक्रार

Gramin Varta
197 Views

सामाजिक कार्यकर्ते विजय टाकळेंकडून बदली व कारवाईची मागणी

चिपळूण : तालुक्यातील एका तलाठ्याच्या उद्धट व असभ्य वर्तनाविरोधात सामाजिक कार्यकर्ते विजय वासुदेव टाकळे यांनी तहसीलदारांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. संबंधित तलाठ्याची तत्काळ बदली करून त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी तक्रारीत केली आहे.

वाळू उपशाशी आपला कोणताही संबंध नसताना संबंधित तलाठ्याने फोन करून शिवीगाळ केल्याचा आरोप टाकळे यांनी केला आहे. टाकळे हे रामवरदायिनी शिक्षणसंस्था, आकलेचे संचालक असून ग्रामपंचायत आकलेचे माजी उपसरपंच आहेत. याशिवाय ते आकले येथे हॉटेल व्यवसायही करतात.

तक्रारीनुसार, १९ डिसेंबर २०२५ रोजी संबंधित तलाठ्याने टाकळे यांना फोन करून, ‘तुम्हाला वाळू काढायला सांगितले नसताना वाळू का काढत आहात?’ अशी विचारणा केली. प्रत्यक्षात आपण कधीही वाळू उपसा केलेला नसतानाही तलाठ्याने फोनवर उद्धट आणि अपमानास्पद भाषा वापरल्याचा आरोप टाकळे यांनी केला आहे.

या संपूर्ण संभाषणाचे ऑडिओ रेकॉर्डिंग आपल्याकडे उपलब्ध असून, त्यामध्ये संबंधित तलाठ्याने आक्षेपार्ह व असभ्य शब्दांचा वापर केल्याचे स्पष्ट ऐकू येते, असेही टाकळे यांनी तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी तहसील प्रशासनाकडे केली आहे.

Total Visitor Counter

3366959
Share This Article