रत्नागिरी : शहरातील गवळीवाडा येथील नगरपरिषद चाळ मध्ये राहणारे रमेश सोळंकी (वय ६३) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. सोमवारी, दिनांक १४ जुलै २०२५ रोजी सकाळी ७.३६ च्या सुमारास ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, रमेश सोळंकी यांना २०१७ पासून हत्तीरोगाचा त्रास होता. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांना स्कीन इन्फेक्शन झाल्यामुळे ते अंथरुणावर खिळून होते. या काळात त्यांनी जेवणखाणही सोडले होते आणि फक्त पेज पिऊन झोपत असत. सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्या शरीरात कोणतीही हालचाल दिसून आली नाही. त्यानंतर तात्काळ त्यांना सिव्हील हॉस्पिटल, रत्नागिरी येथे दाखल करण्यात आले. परंतु, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले.
या घटनेची नोंद शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.
रत्नागिरी: हत्तीरोगाने ग्रासलेल्या वृद्धाचा मृत्यू
