GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी मांडवी येथे चक्कर आल्याने वृद्धाचा मृत्यू

Gramin Varta
177 Views

रत्नागिरी : शहरातील मांडवी परिसरात राहणाऱ्या एका वृद्धाला अचानक चक्कर आल्याने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तपासणीनंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार विष्णू सिताराम वालकर (वय ७५, मूळ रा. भडे, ता. लांजा; सध्या रा. पद्मावती वसाहत, मांडवी, रत्नागिरी) असे मृत वृद्धाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. २५) सकाळी साडेसातच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली.
मिळालेल्या माहितीनुसार वालकर यांनी सकाळी चहा घेतल्यानंतर शौचालयाकडे जात असताना अचानक त्यांना चक्कर आली. कुटुंबीयांनी तात्काळ त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र तपासणीदरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Total Visitor Counter

3366871
Share This Article