GRAMIN SEARCH BANNER

लांजा येथे जिजाऊ संस्थेचा आरोग्यदूत! रत्नागिरीचे तज्ञ डॉक्टर आता दर मंगळवारी मोफत सेवेसाठी उपलब्ध

Gramin Varta
275 Views

लांजा/ सिकंदर फरास: जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र (केंद्र – लांजा, विभाग – रत्नागिरी) यांनी ग्रामीण व गरीब जनतेला उत्तम आरोग्य सेवा सहज उपलब्ध व्हावी यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा उपक्रम लांजा येथे सुरू केला आहे. ‘रुग्ण सेवा हीच, ईश्‍वर सेवा’ हे ब्रीद घेऊन संस्थेचे संस्थापक श्री. निलेश सांबरे यांनी रत्नागिरी येथील सुप्रसिद्ध ‘श्री. भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालय’ येथील तज्ञ डॉक्टरांची सेवा आता लांजा येथेही उपलब्ध करून दिली आहे.

या मानवतावादी उपक्रमांतर्गत, रत्नागिरीचे हे सर्व तज्ञ डॉक्टर आता लांजा येथे दर मंगळवारी लोकांना मोफत आरोग्य सेवा देणार आहेत. सकाळी 11.00 ते दुपारी 2.00 वाजेपर्यंत या वेळेत रुग्णांची मोफत तपासणी केली जाईल, तसेच त्यांना जनरल तपासणी, आवश्यक उपचार आणि योग्य वैद्यकीय मार्गदर्शनही मिळणार आहे. या सेवेमुळे अनेक ग्रामीण रुग्णांना उपचारांसाठी अचूक मार्गदर्शन मिळून आरोग्यविषयक मदत मिळणार आहे.

संस्थेचा मुख्य उद्देश हाच आहे की, चांगल्या आरोग्य सेवेपासून कोणीही वंचित राहू नये. त्यामुळे, लांजा आणि परिसरातील गरजूंनी या मोफत सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
या वैद्यकीय सेवेसाठीचे ठिकाण लांजा येथील लांजा तालुका सहकारी खरेदी विक्री संघ, एस. टी. स्टॅन्डच्या मागे, बँक ऑफ इंडियाच्या वर, लांजा – 416701 येथे निश्चित करण्यात आले आहे.

या उपक्रमासाठी अधिक माहिती किंवा संपर्कासाठी इच्छुकांनी योगेश पांचाळ (संपर्क: +91 8999663079) किंवा लांजा ऑफिस (संपर्क: +91 8692893833) येथे संपर्क साधावा.

श्री. निलेश सांबरे, संस्थापक, जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र हे नेहमीच ‘एक आधारवड जनतेसाठी’ या भूमिकेतून कार्यरत आहेत आणि आरोग्य क्षेत्रातील हा त्यांचा नवीन उपक्रम रत्नागिरी विभागासाठी एक मोठा आधार ठरणार आहे.

Total Visitor Counter

3073033
Share This Article