संगमेश्वर :कडवई येथे आषाढी भाईशा घोसाळकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची वारकरी दिंडी निघाली होती. या दिंडीचे कडवई बाजारपेठ येथे रिक्षा संघटनेने स्वागत केले.यावेळी दिंडीतील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.
कडवई येथील भाईशा घोसाळकर हायस्कूलच्या वतीने प्रतिवर्षी आषाढी एकादशीच्या दिवशी वारकरी दिंडी काढण्यात येते . याहीवर्षी विद्यार्थ्यांची दिंडी काढण्यात आली होती. दिंडीत सुमारे दीडशे विद्यार्थी सहभागी झाले होते. दिंडीत विद्यार्थ्यांना विठ्ठल रखुमाईची वेशभूषा करण्यात आली होती. दिंडीतील टाळमृदुंगांच्या गजराने वातावरण भक्तिमय झाले होते.
.डीतील विद्यार्थ्यांना रिक्षा संघटनेतर्फे केळी वाटप करण्यात आले. बापू खातू यांनी आइस्क्रीमचे वाटप केले. यावेळी मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, कडवईचे उपसरपंच दत्ताराम ओकटे, रिक्षा संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. हायस्कूलमधून निघालेली ही दिंडी कडवई बाजारपेठ येथून पुरोहितवाडी येथील विठ्ठल मंदिरात विसर्जित करण्यात आली.
भाईशा घोसाळकर हायस्कूलच्या वारकरी दिंडीचे रिक्षा संघटनेकडून स्वागत

Leave a Comment