GRAMIN SEARCH BANNER

एनसीसीच्या कोकण विजय २६ नौकाभ्रमण मोहिमेनिमित्त पूर्णगड शाळेत जनजागृती आणि शिस्त संवर्धन संपन्न

Gramin Varta
14 Views

पूर्णगड : महाराष्ट्र एनसीसी नेव्हल युनिटतर्फे आयोजित ‘कोकण विजय २६’ सागरी नौकाभ्रमण मोहिमेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील पूर्णगड नं. १ या जिल्हा परिषद शाळेत विविध ॲक्टिव्हिटीज आणि महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्यात आले. एनसीसीच्या कॅडेट्सनी या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये संघभावना, शिस्त आणि साहसीवृत्तीचे महत्त्व रुजवले, तसेच पर्यावरण संरक्षणाविषयी जनजागृती केली.

या उपक्रमांमध्ये ‘स्वच्छ, सुंदर, समृद्ध कोकण’ या संकल्पनेवर आधारित प्रभावी पथनाट्य सादर करण्यात आले, ज्यातून उपस्थितांना स्वच्छतेचा आणि पर्यावरणाचा संदेश देण्यात आला. त्यानंतर कॅडेट्सनी रॅली काढून पर्यावरण जागृतीचा संदेश अधिक व्यापक केला. याव्यतिरिक्त, विद्यार्थ्यांना भविष्यासाठी आवश्यक असलेल्या शिस्त, एकजूट आणि साहसीवृत्तीची उपयुक्तता समजावून सांगण्यात आली. तसेच, शिडाची जहाजे आणि विविध बोटींचे कार्य कसे चालते, याची माहिती अत्यंत सोप्या आणि परिणामकारक पद्धतीने देण्यात आली.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका भारती तायशेटे, शिक्षिका पूर्वा वाकडे, भारती शिंगाडे, राजेंद्र रांगणकर आणि तृप्ती शिरगावकर यांनी उपस्थित सर्व अधिकारी आणि एनसीसी कॅडेट्सचे स्वागत केले. या यशस्वी उपक्रमाबद्दल संपूर्ण एनसीसी टीमचे आभार मानण्यात आले. या उपक्रमाविषयी शाळा व्यवस्थापन समिती, पालक तसेच शिक्षण बीट विस्तार अधिकारी (पावस) आदरणीय हिरवे मॅडम आणि केंद्रप्रमुख संजय राणे सर यांनी समाधान व्यक्त केले. या माध्यमातून विद्यार्थी वर्गाला नौदल आणि सामाजिक जबाबदारीची मोलाची माहिती मिळाली.

Total Visitor Counter

3072149
Share This Article