रत्नागिरी : कोकणातील गणेशोत्सवाची खरी शोभा म्हणजे आरत्या. वाद्यांच्या साथसंगतीने होणाऱ्या चांदोरकर ग्रुपच्या या सुमधुर आरत्या यावर्षी आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावरून ऐकायला मिळणार आहेत.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने ‘इंद्रधनुष्य’ या विशेष कार्यक्रमात येत्या २७ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता या आरत्या प्रसारित होणार आहेत. सलग दोन वर्षे आरती स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावलेल्या चांदोरकर ग्रुपकडून हा कार्यक्रम सादर केला जाणार आहे.
या कार्यक्रमात मंदार महादेव चांदोरकर, महादेव जगन्नाथ चांदोरकर, अमेय विश्वास चांदोरकर, समीर प्रशांत चांदोरकर व संदीप सुहास चांदोरकर यांच्या आवाजात सुमधुर आरत्या सादर केल्या जातील. संगीत संयोजन आणि हार्मोनियमची साथ पं. अवधूत अनंत बाम यांनी केली असून तबला साथ पुष्कराज महादेव चांदोरकर, पखवाजसाथ तन्मय गजानन चांदोरकर तर झांज साथ समीर प्रशांत चांदोरकर यांनी दिली आहे.
हा विशेष कार्यक्रम आकाशवाणी रत्नागिरीच्या ११४३ KHz मध्यम लहरी वाहिनीवर तसेच १०१.५ MHz एफ. एम. वाहिनीवर प्रसारित होणार आहे. गणेशभक्तांनी हा प्रासंगिक कार्यक्रम आवर्जून ऐकावा, असे आवाहन करण्यात आले आहे
चांदोरकर ग्रुपच्या सुमधुर आरत्या रत्नागिरी आकाशवाणी केंद्रावरून होणार प्रसारित
