GRAMIN SEARCH BANNER

खेडमध्ये दुचाकी अपघातात तरुण जखमी

Gramin Varta
186 Views

खेड : मुंबई–गोवा महामार्गावरील मोरवंडे परिसरात सोमवारी सायंकाळच्या सुमारास दुचाकी अपघाताची घटना घडली. या अपघातात साहिल मेहता (वय २८, रा. खेड–महाड नाका) हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर सामाजिक कार्यकर्ते सुरज हंबीर यांनी तत्काळ मदत करत जखमी साहिल यांना कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

मिळालेल्या माहितीनुसार साहिल मेहता हे आपल्या ताब्यातील दुचाकी (क्र. एमएच ०८ एबी ६८६६) घेऊन लोटे येथून खेडच्या दिशेने येत होते. यावेळी अचानक रस्त्यावर जनावरे आल्याने दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी घसरून अपघात झाला. या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघातात दुचाकीचेही नुकसान झाले असून पुढील तपास सुरू आहे.

Total Visitor Counter

3388222
Share This Article