GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरीतील गाडीतळ, गोखलेनाका येथे जुगार अड्ड्यावर छापा; एकजण ताब्यात

रत्नागिरी (प्रतिनिधी): शहरातील गाडीतळ ते गोखलेनाका दरम्यानच्या रस्त्यावर, सहकार लॉजसमोरील एका बंद टपरीच्या आडोशाला सुरू असलेल्या कल्याण मटका जुगार अड्ड्यावर रत्नागिरी शहर पोलिसांनी छापा टाकला. मंगळवारी, १७ जून रोजी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली असून, या छाप्यात एका व्यक्तीला अटक करत ७ हजार ७५७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल आशिष अशोक भालेकर यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, नरेंद्र गणपत सावंत (५८, रा. फणसोप, भिमनगर, रत्नागिरी) हा मटका जुगाराचा खेळ चालवत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून नरेंद्र सावंत याला रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून ७ हजार ७३० रुपये रोख रक्कम, २० रुपयांचा एक स्टीलचा स्टेपलर, ५ रुपयांची एक प्लास्टिकची पट्टी, २ रुपयांचा एक निळ्या शाईचा बॉलपेन आणि पांढऱ्या रंगाच्या कोऱ्या पानांचे स्टेपलर पिना मारून तयार केलेले पावती पुस्तक जप्त करण्यात आले आहे.
या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Total Visitor Counter

2455855
Share This Article