मुंबई : भटक्या मांजरींचे निर्जंतुकीकरण करणारी मुंबई महापालिका देशात एकमेव असून गेल्या सहा वर्षांत पालिकेने 24 हजार 504 भटक्या मांजरीची नसबंदी आणि लसीकरण केले आहे. एका मांजरीसाठी सरासरी 2 हजार 200 रुपये खर्च येत आहे.
महापालिकेने 2019 मध्ये भटक्या मांजरींचे निर्बीजीकरण आणि लसीकरण करण्याचा निर्णय घेतला. यासाठी आठ स्वयंसेवी संस्थांची निवड केली आहे. त्यांच्यामार्फत हे लसीकरण करण्यात येत आहे. 2020 ते 2022 या काळात महानगरपालिकेने तीन वर्षांसाठी मांजरांच्या नसबंदीसाठी 3 कोटींचे कंत्राट दिले होते.
त्यानंतर 2023 ते 2025 या तीन वर्षांसाठी त्यात दुप्पट वाढ होत 6.40 कोटी रुपयांपर्यंत गेले आहे. त्यानुसार गेल्या सहा वर्षांत महापालिकेने 9 कोटी 40 लाख रुपये खर्च करून 24 हजार 504 भटक्या मांजरीची नसबंदी आणि लसीकरण केले आहे. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या एका वरिष्ठ अधिकार्याने सांगितले की, एक मांजर वर्षातून 2 ते 3 वेळा 4 ते 5 मांजरीच्या पिल्लांना जन्म देते. त्यामुळे नसबंदी करणे गरजेचे आहे.
मुंबईतील 24 हजार भटक्या मांजरींची नसबंदी
