GRAMIN SEARCH BANNER

सागरी पोलीस ठाणे, नाटेचे पोलीस निरीक्षक ए. बी. खेडकर यांची बदली; एपीआय प्रमोद वाघ नवे प्रभारी अधिकारी

Gramin Varta
39 Views

ठोंबरे व झगडे पोलीस उपनिरीक्षक पदावर रुजू

राजन लाड / जैतापूर

सागरी पोलीस ठाणे, नाटे येथील पोलीस निरीक्षक ए. बी. खेडकर यांची बदली रत्नागिरी जिल्हा विशेष शाखा (DSB) येथे करण्यात आली आहे. गेल्या वर्षभरात त्यांनी जनतेशी सुसंवाद ठेवत कायदा व सुव्यवस्था राखण्यात उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांच्या कार्यकाळात अनेक गुन्हे उघडकीस आणण्यात आले असून, पोलीस प्रशासनावरील जनतेचा विश्वास अधिक दृढ झाला.

खेडकर यांच्या बदलीमुळे स्थानिक नागरिक, व्यापारी व ज्येष्ठ मंडळींमध्ये नाराजीचे सूर आहेत. त्यांच्या कार्यक्षम आणि तत्पर सेवेसाठी जनतेकडून विशेष कौतुक होत आहे.

एपीआय प्रमोद वाघ यांची त्यांच्या जागी नवे प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. वाघ यांना यापूर्वी रत्नागिरी येथील स्थानिक गुन्हे शाखेत (LCB) गुन्हे अन्वेषणाचा सखोल अनुभव असून, त्यांनी अनेक गुन्ह्यांचा छडा लावला आहे. त्यांच्या अनुभवाचा लाभ सागरी पोलीस ठाण्याला मिळणार असल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

यासोबतच, ठाण्यात पीएसआय ठोंबरे यांची नियुक्ती झाली आहे. तर, अनेक वर्षांपासून पोलीस दलात सेवा बजावत असलेले झगडे यांना पदोन्नती मिळाल्यानंतर ते पोलीस उपनिरीक्षक पदावर रुजू झाले आहेत.

सध्या एपीआय प्रमोद वाघ प्रभारी अधिकारी म्हणून कार्यरत असून, त्यांच्यासोबत पीएसआय ठोंबरे व पीएसआय झगडे हे दोघे कायदा आणि सुव्यवस्थेच्या जबाबदाऱ्या पार पाडत आहेत.

नवीन अधिकाऱ्यांच्या नियुक्तीमुळे पोलीस ठाण्याची कार्यक्षमता व नागरिकांना मिळणारा प्रतिसाद आणखी प्रभावी होईल, असा विश्वास स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.

Total Visitor Counter

3375562
Share This Article