GRAMIN SEARCH BANNER

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने शाळा चाफेरी नं.१ येथे मोफत वह्या वाटप

Gramin Varta
77 Views

रत्नागिरी – रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा चाफेरी नं.१ येथे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र यांचे वतीने शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आले.

सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक श्री.वासावे सर यांनी पुष्प देऊन केले.दरम्यान जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे सुरू असलेले संस्थेचे कार्यकर्ते श्री.दिपक सांबरे यांनी मांडताना जिजाऊ संस्थेचे संस्थापक श्री.निलेश सांबरे साहेब व कार्याध्यक्ष श्री.धीरज सांबरे यांनी शैक्षणिक, सामाजिक आणि वैद्यकीय क्षेत्रात सुरू ठेवलेल्या मोफत कार्याविषयी माहिती दिली.कोकण हा निसर्ग सौंदर्याने नटलेला प्रदेश.या प्रांतातील मुले सर्वच क्षेत्रात पुढे येतील तेव्हाच खऱ्या अर्थाने विकास होईल याकरिता मग मोफत शाळा, रूग्णालय, संगणक प्रशिक्षण, विविध व्यावसायिक प्रशिक्षण इ.सुरू केली आहेत.त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आपल्या मनोगतातून सांगितले.

या कार्यक्रमाप्रसंगी चाफेरी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ अंजली कांबळे, कार्यकर्ते श्री.दिपक सांबरे,श्री.नितीन वीर, श्री.केशव बलेकर, श्री.वसंत सांबरे मुख्याध्यापक श्री.वासावे सर, शिक्षक श्री.संतोष जाधव,सौ. प्रज्ञा वाघोदे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.जाधव सर यांनी केले.त्यामध्ये खंडाळा परिसरात ॲकडमी सुरू करावी अशी अपेक्षा व्यक्त केली.तर आभार श्री.वासावे सर यांनी मांडताना संस्थेच्या कार्यास शुभेच्छा दिल्या.

Total Visitor Counter

3370202
Share This Article