रायगड – दरवर्षी प्रमाणे डोंबिवली येथील यश ग्राफिक्स चे संस्थापक व स्वामी गगनगिरी महाराजांचे सदभक्त श्री. महादेव महाडिक यांनी यावर्षी रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील वाडांबा या आपल्या मूळ गावी श्री गणेशोत्सवामध्ये पंढरीचे वारीचा इको फ्रेंडली देखावा साकारला असून त्याची श्री गणेशाची मूर्ती ही शाडूचे मातीने साकारण्यात आली असून संपूर्ण सजावट ही पर्यावरण पूरक बनवलेली आहे.
सदर आरास श्री. महाडिक हे डोंबिवली वरून आपल्या कामाचा व्याप सांभाळून दोन दिवस अगोदर येऊन करीत असतात. त्यांना या कामी सर्वश्री अनिरुद्ध महाडिक, स्नेहल महाडिक-उगवेकर, दिव्या तटकरे या मंडळींची मदत मिळत असून वाडांबा ग्रामस्थ मंडळी व राधाकृष्ण महिला मंडळ यांचेही सहकार्य लाभत असते.
वाडांबा येथील समस्त महाडिक परिवाराचा मानाचा महाराजा असलेल्या या श्री गणेशाचे दर्शनार्थ व सजावट देखावा बघण्यास गर्दी होत असून वाडांबा ग्रामस्थ व परिसरातील अनेक गणेश भक्त आवर्जून येत आहेत व या पंढरीच्या वारीच्या देखाव्याचे व सजावटीचे कौतुक करीत आहेत.
गणेशोत्सव देखाव्यात साकारली पंढरीची वारी!
