GRAMIN SEARCH BANNER

पत्रकार समीर शिगवण यांना ‘रत्नागिरी भूषण’ पुरस्कार

Gramin Varta
717 Views

रत्नागिरी : जिल्ह्याच्या विकासाला गती देणाऱ्या आणि सांस्कृतिक जतनाला चालना देणाऱ्या कुणबी महोत्सवात पत्रकार समीर शिगवण यांना ‘रत्नागिरी भूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले. कोकणातील प्रथमच करंबळे तर्फे देवळे गोताडवाडी येथे आयोजित भव्य कुणबी महोत्सवाच्या निमित्ताने हा सन्मान प्रदान करण्यात आला.

सुहास खंडागळे आणि उदय गोताड यांच्या आयोजनाखाली झालेल्या या सांस्कृतिक उत्सवात रविवारी मान्यवरांच्या हस्ते पत्रकार शिगवण यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. कला, क्रीडा, पत्रकारिता, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील त्यांच्या सातत्यपूर्ण व उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा पुरस्कार देण्यात आला आहे.

या प्रसंगी कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, युट्यूबर तसेच विविध क्षेत्रातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात कोकणातील लोकसंस्कृतीचे दर्शन घडवणारे विविध उपक्रमही राबविण्यात आले.

या कार्यक्रमाला रील्स्टार संदीप पावसकर, चला हवा येऊ द्या फेम अभिनेते सचिन काळे, सुनील बेंडखळे उर्फ तात्या गावकर, पुढारी न्यूज चॅनेलचे वृत्तनिवेदक तेजस बोरघरे, प्रा. डॉ. आनंद आंबेकर तसेच गावकर राजेश गोताड,माजी पोलिस पाटील रामचंद्र धावडे, कृषितज्ज्ञ राहुल यादव, बुधाजी खंडागळे,आयोजक सुहास खंडागळे, उदय गोताड,मंगेश धावडे, श्यामकर्ण भोपळकर, सुरेंद्र काब्दुले, डॉ.मंगेश कांगणे,अमित गमरे,नितीन गोताड, सतेज जाधव, अनघा कांगणे, ईश्वरी यादव, स्थानिक ग्रामस्थ, महिला आणि तरुणांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Total Visitor Counter

3199525
Share This Article