GRAMIN SEARCH BANNER

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा ‘तुमच्या कॅमेऱ्यातून महाराष्ट्र’ छायाचित्रण उपक्रम

रत्नागिरी: महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (MTDC) ‘तुमच्या कॅमेऱ्यातून महाराष्ट्र’ या अनोख्या छायाचित्रण उपक्रमाची घोषणा केली आहे. महाराष्ट्राचे वैविध्यपूर्ण सौंदर्य आणि अनुभवांना जगासमोर आणण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. एमटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक, मा. मनोजकुमार सूर्यवंशी (भाप्रसे) यांनी सांगितले की, या उपक्रमाद्वारे छायाचित्रकारांच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राचे सौंदर्य जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केला जाईल.

महाराष्ट्राच्या धुक्याने वेढलेल्या किल्ल्यांपासून ते सोनेरी वाळूने नटलेल्या समुद्रकिनाऱ्यांपर्यंत, शांत आणि मनोहर एमटीडीसी रिसॉर्ट्सपासून ते हिरवाईने भरलेल्या डोंगररांगांपर्यंतचे क्षण टिपण्यासाठी छायाचित्रप्रेमींना आवाहन करण्यात आले आहे. कोकणाच्या किनाऱ्यांवरील लाटा, सह्याद्रीच्या दऱ्यांमधील धुक्याने सांगितल्या जाणाऱ्या इतिहासाच्या कहाण्या, गावातील मळ्यांमधील निळसर आकाश आणि उत्सवांमधील महाराष्ट्राचे स्पंदन कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी हा उपक्रम एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून देईल. नैसर्गिक सौंदर्य, सांस्कृतिक वारसा, भौगोलिक वैशिष्ट्ये आणि रोजच्या जीवनातील अस्सल मराठमोळे अनुभव या स्पर्धेचा भाग असतील.

या उपक्रमात सहभागी होण्यासाठी, महाराष्ट्रातील कोणत्याही एमटीडीसी पर्यटनस्थळी काढलेले आपले आवडते फोटो https://forms.gle/rpUWF8zTQudr7jzh8 या लिंकवर अपलोड करावे लागतील.

स्पर्धेसाठीचे निकष खालीलप्रमाणे आहेत:

- Advertisement -
Ad image

दृश्य प्रभाव व सौंदर्यदृष्टी
सांस्कृतिक, नैसर्गिक व भौगोलिक सुसंगती
सर्जनशीलता, कलात्मक मांडणी व छायाचित्रामागची कथा
या उपक्रमात दररोज, दर आठवड्याला, महिन्याला आणि वर्षाभरात सर्वोत्तम छायाचित्रांची निवड केली जाईल. निवडक छायाचित्रे एमटीडीसीच्या अधिकृत वेबसाईट, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आणि विविध कार्यक्रमांमध्ये प्रदर्शित केली जातील, ज्यामुळे छायाचित्रकारांना अनोखी प्रसिद्धी मिळेल. प्रत्येक आठवड्यातून व महिन्यातून निवडक फोटो ‘Image of the Day’, ‘Image of the Week’ आणि ‘Image of the Month’ म्हणून गौरवले जातील. महिन्याच्या विजेत्यांना विशेष सन्मानचिन्ह प्रदान केले जाईल. वर्षाअखेरीस, ‘Image of the Year’ म्हणून निवड झालेल्या पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पुरस्कार दिले जातील, तसेच टॉप १० उत्कृष्ट फोटोंसाठी ‘Honourable Mention’ देखील दिली जाईल.

पर्यटन विभागाचे प्रधान सचिव मा. डॉ. अतुल पाटणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला जात असून, महामंडळाचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल सर्वांशी समन्वय साधून आहेत, अशी माहिती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी दिली. अधिक माहितीसाठी www.mtdc.co या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

Total Visitor

0214467
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *