सिंधुदुर्ग : कोल्हापूर-वैभववाडी या रेल्वे मार्गाला लवकरच चालना देण्याची ग्वाही केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. खा. नारायण राणे यांनी कोकण रेल्वेसंबंधी कोकणवासीयांच्या अनेक मागण्यांबाबत बुधवारी वैष्णव यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.
यावेळी मंत्री वैष्णव यांनी कोल्हापूर-वैभववाडी या रेल्वे मार्गाला लवकरच चालना देण्याची ग्वाही देतानाच नव्या रेल्वे मार्गाचा प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.
यावेळी मंत्री वैष्णव यांनी कोल्हापूर-वैभववाडी या रेल्वे मार्गाला लवकरच चालना देण्याची ग्वाही देतानाच नव्या रेल्वे मार्गाचा प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे पुढील काळात कोल्हापूर-वैभववाडी या गेल्या अनेक वषार्र्ांसून प्रतीक्षेत असलेल्या रेल्वे मार्गाच्या कामाला गती मिळण्याची शक्यता आहे. यावेळी झालेल्या चर्चेत कोकणाबाबत रेल्वे मंत्र्यांनी सकारात्मकता दर्शवली आहे. रेल्वे प्रशासनाकडूनही त्याला सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला आहे. कोकणातील उद्योगाला चालना मिळावी,थेट पश्चिम महाराष्ट्र कोकणाशी रेल्वेने जोडला जावा, येथील मत्स्य उद्योगालाही नव्याने चालना मिळावी यासाठी कोल्हापूर-वैभववाडी हा रेल्वे मार्ग गेले कित्येक वर्षे प्रस्तावित आहे. हा रेल्वे मार्ग झाल्यास प्रवासाबरोबरच नवीन औद्योगिक क्षेत्राला ही चालना मिळणार आहे. जलमार्गे इम्पोर्ट, एक्स्पोर्ट या औद्योगिक धोरणालाही नव्याने बळ मिळू शकते. यामुळे कोकणातील अर्थव्यवस्थेला चालना मिळेणार आहे. कोकणवासीयांच्या कोकण रेल्वेसंबंधी अनेक मागण्यांना रेल्वेमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
जामनगर-तिरुनेलवेली एक्स्प्रेस, पोरबंदर-तिरुवनंतपुरम एक्स्प्रेस आता संगमेश्वर रोड स्थानकावर थांबणार
चिपळूण-कराड या दुसर्या महत्त्वाच्या मार्गाच्या आशाही पल्लवित
याच पार्श्वभूमीवर आता चिपळूण ते कराड या गेले कित्येक वर्ष प्रस्तावित असलेल्या व रखडलेल्या नव्या रेल्वे मार्गालाही या विषयामुळे चालना मिळू शकते. केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी वैभववाडी कोल्हापूर या नव्या प्रस्तावाचा विचार करतानाच रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण ते कराड या कोकण ते पश्चिम महाराष्ट्र जोडणार्या रेल्वे मार्गाचाही विचार करावा अशीही मागणी आता समोर आली आहे.
गणेशोत्सवासाठी गतवर्षीपेक्षा अधिक विशेष रेल्वे गाड्या सोडण्याची मागणी खा.राणे यांनी केली. महत्त्वाच्या रेल्वे गाड्यांना खेड, चिपळूण व संगमेश्वर रोड स्टेशनवर गाड्यांना थांबा देण्याचीही मागणी पत्राद्वारे केली होती. या संदर्भात आता कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने 10 जुलै 2025 रोजी रेल्वे बोर्डाला दिलेल्या उत्तरात 19577/19578 जामनगर-तिरुनेलवेली एक्सप्रेस आणि 20910/20909 पोरबंदर-तिरुवनंतपुरम एक्सप्रेसचा संगमेश्वर रोड स्टेशनवर थांबा कार्यान्वित करणे शक्य आहे. सध्या संगमेश्वर रोड स्टेशनवर 12 गाड्या थांबतात, ज्यात 10 दैनिक एक्सप्रेस गाड्यांचा समावेश आहे.
वैभववाडी – कोल्हापूर रेल्वे मार्गाला चालना देणार
