ग्रामस्थांनी केला प्रशांत यादव यांचा यथोचित सन्मान
सचिन यादव/ धामणी
तालुक्यात सध्या नवरात्री उत्सवाची लगबग सुरू आहे या नवरात्रोत्सवातचभाजपा नेते तथा उद्योजक प्रशांत यादव यांनी संगमेश्वर तालुक्यातील सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ तसेच ग्रामदैवतांचे दर्शन घेऊन तालुक्यामध्ये पुन्हा एकदा झंझावात निर्माण केल्याने तालुक्यातील भाजपमध्ये नव चैतन्य निर्माण झाले असून गावागावातील ग्रामस्थ व मानकरी यांच्या वतीने प्रशांत यादव व भाजपच्या पदाधिकारी यांचे जोरदार स्वागत करण्यात येत आहे.
तालुक्यातील अनेक नवरात्रोत्सव मंडळ व ग्रामदेवता यांचे दर्शन घेण्यासाठी आज यांनी संगमेश्वर तालुक्याचा झांजावती दौरा केला या दौऱ्यात त्यांनी धामणी येथील ग्रामदैवत वाघजाई नवलाई देवी च्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले व अनेक मंडळ व ग्रामदेवतांचे दर्शन घेऊन तालुक्यात भाजपला गतवैभव प्राप्त होऊ दे असे साकडे घातले
तसेच आमच्या शेतकरी बांधवांना सुगीचे दिवस येऊदे शेतकरी बांधव सदैव सुखी राहूदे अशी प्रार्थना त्यांनी केली यावेळी त्यांच्यासोबत तालुकाध्यक्ष विनोद म्हस्के, सरचिटणीस डॉ अमित ताठरे युवा मोर्चा तालुकाध्यक्ष स्वप्निल सुर्वे सरपंच, युवा मोर्चाचे रोशन सुर्वे स्वप्निल पाटेकर शरद यादव रोशन पाष्टे यांच्यासह तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते
प्रशांत यादव यांनी घेतले धामणी येथील वाघजाई नवलाई देवीचे दर्शन
